बाप हा बाप असतो...

  • 3.4k
  • 1.2k

बाप नमस्कार मित्रांनो, आज कहानी नाही आयुष्यात अचानक आलेल्या एका वादळाची गोष्ट तुम्हाला सांगणार आहे, आणि हे वादळ आले ते माझ्या आयुष्यात... ज्याची कल्पना तर सोडाच स्वप्नात सुद्धा कधी विचार आला नसेल...1 जुलै 2023, शनिवार नेहमी प्रमाणे सगळ कस सुरळीत चालू होत...संध्याकाळी अचानक 7.30 ला ताई चा फोन आला, आणि मन उदास झालं....तीच वाक्य होत...अरे कृष्णा... अण्णा सापडत नाही...मला थोड वेगळं वाटलं...कारण ती अस कधीच म्हणाली नव्हती... क्लास चालू होता...त्यामुळे तिला थांब म्हणत ...मी....घराबाहेर आलो आणि पुन्हा विचारलं....हा बोल ताई काय म्हणालीस...तेव्हा दबक्या आवाजात ती पुन्हा तेच म्हणाली...अरे अण्णा सकाळी निघालेले माझ्याकडे यायला पण ते आलेच नाही....मी ही थोडा अस्वस्थ होऊन म्हणालो, अरे सकाळी निघाले