मालिका....आयुष्यातल्या अनुभवांची - 12

  • 2k
  • 816

पान १२              त्या दिवशी म्हणजे सोमवारी आम्हाला बाईंचं असं झालेलं समजलं. सगळ्या मुलींसाठी हा खूप मोठा धक्का होता.पण , आमच्या बाई खूप चांगल्या होत्या. वर्गातल्या सगळ्या मुलींच्या आवडत्या होत्या. त्या आम्हाला कधीच ओरडल्या नाहीत, नेहमी समजून घ्यायच्या आणि भारी शिकवायच्या. त्यांना खूप वेळा उत्तम शिक्षिका म्हणून पुरस्कार मिळाला होता.त्या असं अचानक समजल्यामुळे खूप मुलींना चक्कर आली तेव्हा. आज आमच्या बाई हयात नाहीत. पण , त्यांच्या आठवणी मात्र मनामध्ये कायम ताज्या राहतील.           आता परत हॉस्टेल मधला गोंधळ सांगते. माझी एक सई नावाची मैत्रीण होती. तीच आणि माझं एकदा फार मोठं भांडण झाल