खेळीया

  • 2.1k
  • 801

तात्या पालव बाहेर अंगणात येरझरा घालत होते. त्यांचा चेहरा चिंताक्रांत दिसत होता. मध्येच ते स्वतःशी पुटपुटत मान झटकत होते. त्यांच्या मनात चाललेल्या विचारांचे द्वंद्व त्यांच्या चेहर्यावर स्पष्ट दिसत होते. एवड्यात त्यांची पत्नी-देवकी घाबरीघुबरी होत बाहेर आली. "अहो !आयकल्यास काय---आई कायतरीच करतात.चला लवकर आत." तात्या धावतच आत गेले.माजघराच्या बाजूच्या खोलीत त्यांची आई पलंगावर अखेरच्या घटका मोजत पडली होती. तिच्या घरातून विचित्र आवाज येत होते.या आवाजामुळे देवकी घाबरली होती.तात्यांनी डाॅक्टरनी दिलेली गोळी आईच्या जीभेवर ठेवली. गोळी झटकन विरघळली. दोन चमचे पाणी त्यांनी आईच्या तोंडात घातले. घशातून येणारा आवाज थोडा कमी झाला. तात्या आईच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले, " ह्यो---नाना डाॅक्टराक हाडूक गेलो