अनुबंध बंधनाचे. - भाग 1

  • 13.1k
  • 7.6k

अनुबंध बंधनाचे.....( भाग १ )!! प्रस्तावना !!नमस्कार माझ्या प्रिय वाचक मित्र आणि मैत्रिणींनो...माझे नाव मेघना उर्फ मेघा.... आज मी तुम्हा सर्वांसाठी एक खुप छान अशी प्रेमकथा घेऊन आली आहे.... तसं तर अशा कथा खुप असतात, आणि तुम्ही सर्वांनी पण आत्तापर्यंत खुप प्रेमकथा वाचल्या असतील. पण हि प्रेमकथा खुप वेगळी आहे. कारण ही प्रेमकथा मी अगदी जवळुन अनुभवली आहे. आणि या कथेचं मी पण एक पात्र आहे. त्यामुळे कदाचित ते अनुभव तुमच्याशी शेअर करावेसे वाटले. म्हणुन मी हा एक छोटासा प्रयत्न करतेय. मुळात मी लेखिका वगैरे नाहीये... त्यामुळे काही चूक झाली असेल तर माफ करा. खरं तर हि कथा लिहिण्याचे कारण म्हणजे...