आत्मनस्तु कामायःलाक्षागृहातून सुरक्षित बाहेर पडल्यावर पांडवांनी ब्राह्मणवेष धारण केला. भिक्षा मागून उदरनिर्वाह करीत मत्स्य, पांचाल, त्रिगर्त आदि अनेक देश हिंडत ते एकचक्रा नगरीत एका एका ब्राह्मण कुटुंबात राहिले. वेशांतर केल्यामुळे कुणीही त्यांना ओळखू शकले नाही. तेथे एका ब्राह्मणाकडून पांचाल देशात द्रुपदाची कन्या ‘कृष्णा’ हिचे स्वयंवर आयोजित केल्याचे वृत्त त्यांना समजले. यज्ञकुंडातून प्राप्त झालेली, दैदीप्यमान अंगकांती असलेली कृष्णा ‘पण’ जिंकून मिळवण्यासाठी पांडव एकचक्रा नगरीबाहेर पडले. कुंतीसह अहोरात्र मार्गक्रमण करीत करीत करीत पांचाल देशात पोहोचले. तेथे एका कुंभाराकडे कुलाल शाळेत त्यांनी मुक्काम केला. स्वयंवराचा दिवस येईपर्यंत भिक्षा मागण्याच्या निमित्ताने त्यांनी संपूर्ण कुसुमावती नगरीचे निरीक्षण केले.स्वयंवराचा दिवस उजाडला. राजधानीच्या ईशान्येला भव्य मंडप उभारला