निकिता राजे चिटणीस - भाग १५

  • 2k
  • 1k

निकिता राजे  चिटणीस भाग १५ भाग १४ वरून  पुढे वाचा .... नितीन घरी जातांना बरोबर निकिता येणार होती. पण नाही आली. म्हणाली “मला माझी भूमिका नीट पार पाडू द्या. मालकांच्या बरोबर एक ट्रेनी मुलगी जातेय, हे बरोबर दिसणार नाही. तुम्ही जा, मी बस ने येईन किंवा रिक्षाने येईन तुम्ही काळजी करू नका. आता काय बोलणार?” तिच हे रूप फार नवीन होत. आईला विचारल पाहिजे. तिला कदाचित याची पूर्ण कल्पना असेल. घरी जातांना एका ठिकाणी पांच मिनिटांच काम होत ते आटपून निघालो आणि ट्रॅफिक जाम मध्ये अडकलो. घरी आलो तेंव्हा निकिता आली होती. बाबा आई आणि निकिता चहा घेत होत्या. आईने