पाश्चांत्यांचं अनुकरण, संस्कृतीला मारक

  • 2k
  • 801

पाश्चांत्यांचं अनुकरण ; संस्काराला मारक की तारक? *आज पाश्चात्य संस्कृती आपल्या देशात शिरु पाहात आहे. महिला सक्षमीकरण व समानतेच्या हत्यारानं विवाहासारखा एक चांगला संस्कार तुटू पाहात आहे. पाश्चात्त्य संस्कृतीच्या नादाला लागून लोकांनी कमी कपडे घालायला सुरुवातच केली नाही तर विवाहासारखा चांगला संस्कारही मोडायला सुरुवात केली आहे. त्यातच महिलाच्या महिलाही आज नशेच्या अति आहारी गेल्याची चित्रे दिसत आहेत. आजची तरुणाई रात्रभर डॉन्सबारमध्ये नशा करीत झिंगत असलेली दिसते. ज्यात तरुणच नाहीत तर तरुणीही दिसतात. ज्या शिक्षणाच्या नावावर मायबापापासून कितीतरी दूर राहावयास गेलेल्या असतात. मोबाईलचा शोध लागल्यानं मायबाप येतीलच तर फोन करुन येणार, याचा अंदाज बाळगून. ज्यातून विवाहबद्ध होण्यापुर्वीच लिव्ह इन रिलेशनशीप तरुण