हम साथ साथ है - भाग ११

  • 2.1k
  • 1.2k

हम साथ साथ है भाग ९वामागील भागावरून पुढे..सकाळी उठल्यापासून सुलूची लगबग चालू होती. दीपक नेहमीप्रमाणे कंपनीच्या बसने निघून गेला होता. आज सकाळी उठताच सुलूला वाटले होते रोज असा रूक्ष दिवस का उगवतो? रोज सकाळी उठल्यापासून रूक्षपणे तीच तीच कामे करायची. वेगळं काही वाटेल असे घडायचं नाही. आता स्वयंपाकाला बाई असल्यामुळे तिचं एक काम कमी झालं होतं.सुलूला रोजचा दिवस गेलेल्या दिवसापेक्षा वेगळा हवा असायचा. हसरा चुणचुणीत, पण छे! “आपल्या नशिबी कुठला असा दिवस यायला..." असे कातावतच म्हणायची. आत्तासुद्धा असे स्वतःशी बडबडतच तिनं डबा भरला अचानक तिला वाटलं डब्यात लोणचं न्यावं. या वाटण्यानेच तिला खूप बरं वाटलं. चला डब्यात पोळी भाजी बरोबर