हम साथ साथ है - भाग १

  • 6.6k
  • 3.6k

हम साथ साथ है…भाग १ला                           ऑफीस संपवून घरी परतणाऱ्या सुलभाला घरी जाण्याची इच्छाच नव्हती. आजकाल रोजच तिला असं वाटायचं. कारण घरी गेल्यावर नेहमीप्रमाणे सासूचा लांब चेहरा बघा आणि मधून मधून कुचकट बोलणी ऐका. तेही कमी पडले तर तोंडी लावणे म्हणून नणंदेचे रडगाणे असायचेच नणदेचं लग्न नावालाच झालेलं होतं. तिचे अर्धे दिवस माहेरीच जात. आपलं डेस्क आवरता आवरता रोजच सुलभाच्या डोक्यात हे विचार येत. पर्स घेऊन सुलभा उठली तेव्हा तिला कालचा प्रसंग म्हणजे सासूबाई आणि रेवती तिची नणंद यांचा संवाद आठवला," रेवती तुझ्या नव-याला ठामपणे सांग मी बदलीच्या ठिकाणी चंद्रपूला येणार नाही."" माझं कसलं ऐकतो तो. त्याला सगळं आपल्याच मनाचं करायचं