अळवावरचं पाणीअन् धुंदीच्या त्याक्षणी सुधानं प्रमोदला लग्नाचं वचन दिलं. बेल्ट पॉकेटमधून पॉलिथीन सॅक काढून प्रमोद म्हणाला, "या प्रसंगाची आठवण म्हणून ही छोटीशी गिफ्ट..." अधीर झालेल्या सुधानं सॅक उघडली. सोन्याच्या चमकीशिवाय अन्य दागिना आयुष्यात न घातलेली सुधा... टॉप्समधले लखलखणारे हिरे ती विस्फारीत नेत्रांनी पहातच राहिली. अनवधनाने ती बोलून गेली, "खूप कॉस्टली आहेत हे टॉप्स. केवढ्याला मिळाले?" प्रमोद बेफिकिरीने म्हणाला, "ओन्ली सेव्हन धाऊजंडस... तू नक्की होय म्हणशील याची खात्री होती मला..."सात हजार हा आकडा ऐकूनच सुधा हवेत तरंगायला लागली. मूडमध्येच ती होस्टेलवर आली. रूम पार्टनर्स मेसवर गेल्या. सुधा त्या आरशासमोर उभी राहिली अन् टॉप्स कानात घालून स्वतःच्या छबीकडे मनसोक्त पाहून घेतलं. रात्री