कर्मयोगी संत सावता माळी

  • 2.1k
  • 705

कर्मयोगी संत सावता माळी..प्रपंची असुनी परमार्थ साधावा I वाचे आळवावा पांडुरंग Iमोट, नाडा,विहीर, दोरी Iअवघी व्यापिली पंढरी Iकिंवा'स्वकर्मात व्हावे रत, मोक्ष मिळे हातोहात।’‘सावत्याने केला मळा। विठ्ठल देखियला डोळा।’ ज्या काळात ईश्वर प्राप्तीसाठी अनेक महान संत तीर्थाटने, भजन, कीर्तन, योगयाग,जपतप वा व्रतवैकल्ये आदी मार्गांचा अवलंब करत होते त्याच काळात असेही एक संत होते,ज्यांनी ईश्वरप्राप्तीसाठी कर्मयोगाचा अवलंब केला आणि आपल्या कामात पांडुरंग शोधायला भक्तांना सांगितले. हे महान संत म्हणजे ज्ञानेश्वर नामदेव यांचे समकालीन संतश्रेष्ठ सावता माळी! ईश्र्वराला प्रसन्न करून घेण्यासाठी योग-याग-जप-तप, तीर्थव्रत, व्रतवैकल्ये याची बिलकूल आवश्यकता नाही तर केवळ ईश्र्वराचे अंत:करणपूर्वक चिंतन हवे आहे अशी शिकवण त्यांनी दिली. संत सावता माळी यांच्याबद्दल