आतातरी थांबा, आम्हाला विद्यार्थी घडवायचेय?

  • 1.2k
  • 1
  • 411

आतातरी थांबा, आम्हाला विद्यार्थी घडवायचेय? विद्यार्थी शिकवा अशा अर्थाची सरकारची आरोळी. ते शिकले पाहिले व त्यांना सर्वांगीण ज्ञान आले पाहिजे म्हणून सरकारचे प्रयत्न. ते राबवीत असलेले उपक्रम. त्यातच नुकताच शालेय साप्ताहिक उपक्रमाअंतर्गत आठवड्याभराचा एक शैक्षणिक उपक्रम पार पडला. ज्यात विद्यार्थ्यांचे दोन तीन दिवस वाया गेलेत. ज्यात नाटिका, खेळ, निबंध, कथाकथन, नृत्य यावर भर दिल्या गेला होता. त्यातच तीन दिवसाची पायाभूत चाचणीही घेण्यात आली. त्यातही एक दिवस वाया गेलाच आणि आता पुन्हा शासनानं माझी शाळा या उपक्रमाअंतर्गत दि. पाच ऑगस्टपासून महिनाभर आणखी उपक्रम राबविण्याचे ठरवले आहे. उद्देश आहे की विद्यार्थी सर्वकष शिकायला हवा. शिक्षणाच्या बाबतीतील मागील वर्षीचा इतिहास थोडक्यात असा आहे.