विद्यार्थी शिकतीलच. जर..... *अलिकडील काळ असाच आहे की या काळात विद्यार्थ्यांना शिकायला शिक्षकांची गरज नाही. ते स्वतःच शिकत असतात. जसा मोबाईल. मोबाईल प्रसंगी एखाद्या शिक्षकाला हाताळता येत नाही. परंतु एखाद्या विद्यार्थ्याला हाताळता येतो. यात त्यांना मोबाईल कोणी शिकवला? असा जर विचार केला तर तो मोबाईल त्यांना कोणीच शिकविलेला नसतो. ती मुलं स्वतःच शिकलेली असतात, त्याचं कारण म्हणजे स्वयंप्रेरणा होय.* मुलं शिकवणं ही एक कसरतच आहे. मोठ्या मुलांना शिकवणं तेवढी कसरत नाही. त्यांना फक्त कन्ट्रोल करावं लागतं. ते ज्याला जमलं. त्याला शिकवणं जमलं. कारण ती मुलं कन्ट्रोल झालीत की ते त्यानंतर चूप बसतात. मग त्यांना फक्त मार्गदर्शनच करावं लागतं. त्यातच जो