प्रकरण १० तिथून निघाल्यानंतर पाणिनी टॅक्सी करून आपल्या ऑफिसमध्ये आला " सौम्या, प्रचिती बद्दल काही कळलं? काही बातमी कानावर आली आहे?" त्याने विचारलं तिने नकारार्थी मान हलवली. पाणिनीने समाधानाने निश्वास सोडला. “देवनार वरून काही फोन आला तर सांग. मला बोलायचंय. पुढच्या पंधरा मिनिटात जर मला अपेक्षित असलेला फोन आला नाही तर आपणच देवनारच्या पोलीस स्टेशनला फोन लावू आणि चौकशी करू आणि त्याने काही प्रतिसाद दिला नाही तर आपण तिथल्या कोर्टात प्रचिती पारसनीसला जिवंत किंवा मृत प्रत्यक्ष हजर करा म्हणून अर्ज देऊ. रिट ऑफ हेबिअस कोर्पस.” “का? काय घडलं एवढं?” सौम्यान विचारलं “त्यांनी प्रचिती पारसनीसला अटक केल्ये ” पाणिनी म्हणाला “अफरातफरीच्या