धर्मयोगी भाग तीन आबेद आज थोडा वयस्क झाला होता. तो विवाहयोग्य झाला होता. त्याचे आईवडील तिथं जाताच मरण पावले होते. परीवार तसा वाचला नव्हताच. आबेद वयानं वाढला होता. तसं पाहिल्यास त्याचं विवाहयोग्य वय झालं होतं. परंतु त्याला कोणतीच मुलगी आवडत नव्हती. सारखं वाटत होतं की शर्मिला भेटावी व आपल्याला तिच्याशी विवाह करता यावा. त्यातच त्याला आठवत होती तिची जखम. तिचं हाताची नस कापणं. शिवाय आपणच तिचा विश्वासघात करुन तिला धोका दिल्याचंही जाणवत होतं. आबेदला विचार येत होता. विचार येत होता तिला भेटण्याचा. परंतु भेटावं कसं. कारण त्याचेजवळ पैसा नव्हता. त्याचं कारण होतं, हाताशी काम नसणं. तसं त्याला त्याचा भुतकाळ आठवत