कामीनी ट्रॅव्हल - भाग ३०

  • 1.5k
  • 783

कामीनी ट्रॅव्हल्स भाग३० त्या दिवशी सकाळची थोडी कामं आटोपून कामीनी बाई समोरच्या खोलीत पेपर वाचत बसल्या होत्या. प्राची आणि हर्षवर्धन नाश्ता करून कामीनी ट्रॅव्हल्सच्या ऑफीसमध्ये गेले होते. भय्यासाहेब त्यांचे मित्र जयंत सरदेसाई यांच्याकडे गेले होते. तन्मय नेहमीप्रमाणे काॅलेजला गेला होता. समोरच्या खोलीचं दार उघडंच होतं. कामीनीबाईंचा सावत्र मामेभाऊ आणि मामा तरातरा चालत घरात शिरले. "बोलायला वेळ आहे का?" कामीनी बाईंनी नजर वर करून आवाजाच्या दिशेनी बघीतलं. दिनूमामा आणि विश्वासला बघून त्यांना आश्चर्य वाटलं. कामीनी बाई त्यांना बसा म्हणाल्या तसा दिनू मामाच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला. "वा! हे छान आहे आपलं भलं झालं की इतरांना विसरायचं. माझ्यामुळे तू या श्रीमंत घरी