कामीनी ट्रॅव्हल्स भाग २७ सकाळी सकाळी प्राचीला सरदेसाई काकांचा फोन येतो. "हॅलो.बोला काका." "प्राची तुझ्यासाठी आनंदाची बातमी आहे. भय्या तयार झाला वहिनींना घरी येऊ द्यायला." " काका खूप खूप धन्यवाद. तुम्ही केवढं मोठ्ठं काम केलंय माझं. आईं तर सारख्या अस्वस्थ आहेत.मी शंकरला आजच बोलावते. आईंना घेऊन जाईल तो." "अगं चांगलं तासला भय्याला एवढा आजारी आहे पण हरामखोराची घमेंड जात नाही. तू आता काळ्जी करू नको. मी कालच त्याला सांगून टाकलंय की मी रोज येणार आहे म्हणून. सध्या रोज जाण्याचा माझा उद्देश हा आहे की मध्येच या प्राण्याचं काही बिनसलं तर वहिनींची पंचाईत होईल. आमचा मित्र आहे म्हणून सांगतो व्हिमझिकल स्वभावाचा