कामीनी ट्रॅव्हल - भाग २६

  • 1.7k
  • 978

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २६ भय्यासाहेबांना आज दवाखान्यातून डिस्चार्ज मिळाला. भय्यासाहेबांनी स्वतःच्या कारनी घरी जाईन ॲम्ब्यूलन्स नको असं स्पष्ट सांगीतलं होतं. डिस्चार्ज घेताना बिलींग डिपार्टमेंटमध्ये सगळे पैसे भरल्यावर भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयनी त्यांचे कपडे घालून व्हिलचेयर वर बसवलं. भय्यासाहेबांच्या नजरेस कोणी येणार नाही याची सगळ्यांनी काळजी घेतली. न जाणो यांच्यापैकी कोणाला बघून त्यांचा पारा चढला तर पुन्हा पंचाईत. कारमध्ये भय्यासाहेबांना वाॅर्डबाॅयने बसवलं.आणि कारचं दार लावलं. एवढ्याश्या गोष्टींनी पण त्यांना दमल्या सारखं झालं. त्यांनी क्षणभर डोळे मिटले. आपल्या शेजारी कोणीतरी बसल्याचं त्यांना जाणवलं तसं त्यांनी डोळे उघडून बघीतलं तर बाजूला कामीनी बाई बसलेल्या दिसल्या. "तुम्ही कशाला बसलात कारमध्ये? उतरा." " अहो ओरडू नका. आत्ताच