कामीनी ट्रॅव्हल - भाग २५

  • 1.7k
  • 1
  • 1k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २५ मागील भागात आपण बघीतले की भय्यासासेबांच्या आजारपणामुळे कामीनी बाईं अस्वस्थ झाल्या.आता पुढे काय होईल ते बघू. .दुस-या दिवशी सकाळी उठल्यावर कामीनी बाई देवघरातील देवासमोर हात जोडून नि:श्चल उभ्या राहून मनातच देवाजवळ आपली चिंता,काळजी सांगू लागल्या. "देवा परमेश्वरा प्राची आपल्या आयुष्याची छान सुरुवात करायला केवढ्या ऊत्साहानी प्रवासाला निघाली होती. मध्येच यांचं आजारपण का निघालं? परमेश्वरा यांच्या दुखण्याचे पडसाद प्राची आणि हर्षवर्धन यांच्या आयुष्यावर संसारावर नको उमटू देऊ. त्याची काळजी तूच घे. तुझ्या मनात काय आहे हे कोणालाच कधीही कळत नाही. तू कश्या चाली चालतोय ते कोणालाच माहित नसतं. यांच्या आजारपणातून काही चांगलं घडवणार आहेस का? माझा तुझ्यावर