कामीनी ट्रॅव्हल - भाग २४

  • 1.8k
  • 999

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २४ प्राची हर्षवर्धन टूरवर जायला निघतात. दोघांना सोडायला राधा, शशांक आणि कामीनी बाई जातात. हर्षवर्धन गोंधळलेलाच असतो. सगळ्यांना ते जाणवतं पण कोणीच तसं दर्शवत नाही. दोघं ऊटी म्हैसूर हैद्राबाद फिरुन येणार असतात. सुरवातीला प्राचीला लक्षात येतं प्रथम हर्षवर्धनची गोंधळलेली अवस्था दूर करावी लागणार तेव्हा तो मनमोकळेपणानी बोलेल. असं बोलणं सुरु झाल्यावर आपोआप त्याच्यातला न्यूनगंड कमी होईल. न्यूनगंड गेला की प्राचीच्या बरोबरच्या पातळीवर आपण आहोत हे हर्षवर्धनला जाणवेल. दोघांमधलं प्रेम त्याचवेळी फुलायला सुरवात होईल. प्राची त्यांचं क्षणाची वाट बघते आहे. प्राची सगळ्या अंगानी हर्षवर्धनला समर्पित होण्यासाठी तयार आहे. ते विमानात बसतात. हर्षवर्धनचं चेहरा बावरलेला असतो.त्याने प्राचीकडे बघीतलं तशी