कामीनी ट्रॅव्हल - भाग २२

  • 1.6k
  • 975

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २२ मागील भागात आपण बघीतले की प्राची छान स्वप्नात मश्गूल असताना कोणाचा तरी तिला फोन आल्याने ती भानावर आली. कोणाचा फोन आला असेल? बघू या भागात फोन कोणाचा आहे म्हणून प्राचीने बघीतलं तर स्क्रीन वर नाव नव्हतं नुसताच नंबर दिसला तरी प्राचीने फोन घेतला, " हॅलो…" प्राची म्हणाली. " मॅडम मी पटेल इनव्हेस्टमेंट मधून बोलतेय.आपण प्राची मॅडम बोलताय?" समोरून त्या मुलीने प्राचीला विचारलं. " हो पण मी सध्या मिटींग मध्ये आहे. मला तुर्तास तरी काही इनव्हेस्ट करायचं नाही.साॅरी." " ओके मॅम नो प्राॅब्लेम.थॅंक्यू." समोरून फोन कट झाला. प्राची मधील अभिसारीकेचा फार हिरमोड झाला.खूप सुंदर स्वप्नात ती रममाण