कामीनी ट्रॅव्हल - भाग २१

  • 1.9k
  • 1.1k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग २१ राधाचा फोन कशासाठी आला असेल बघू या भागात. " हॅलो, बोल राधा.मी आत्ता तुलाच फोन करणार होते." " कधी जाताय तुम्ही हनिमूनला?" " प्रियाला प्लॅन करायला सांगते आहे." " प्राची हनिमूनला जातांना ऑफीसमधले सगळे विचार ऑफीसमध्येच सोडून जायचे. तू जितके दिवस हनिमूनला जाणार आहेस तितके दिवस तुला हर्षवर्धनच्या जवळच राह्यचं आहे." " हो कळतंय मला. मलाच हर्षवर्धनला आमच्यामधील नात्याची ओळख करून द्यावी लागेल. त्याच्या मनातील माझ्या प्रेमाला हळूवारपणे बाहेर आणावं लागेल. सध्यातरी तो माझ्या बद्दलच्या भावना व्यक्त करायला बिचकतो. ते बिचकणं मला आधी दूर करावं लागेल. राधा खूप हळूवारपणे मला वागावं लागणार आहे." " तेच म्हणतेय