प्राक्तन - भाग 5

  • 3.5k
  • 1.9k

प्राक्तन -५" यश________" तिने अगतिकपणे त्याच्या खांद्यावर थरथरता हात ठेवला. तसं त्याने तिच्याकडे बघितलं. तिच्या डोळ्यात उभे ठाकलेले असंख्य प्रश्न त्याला कळत होते. " लिव्ह इट. कुल डाऊन... ओके. " तो स्वत: ला सावरत म्हणाला. " नाही मला जाणून घ्यायचंय तुझ्या या खोल दुःखामागचं कारण... तू सांग यश, बोल, रड आणि मन मोकळं कर. जर खरंच तू मला तुझी मैत्रिण समजत असशील तर..." अनिशा मन घट्ट करत म्हणाली. मैत्रिण म्हणून तिचा हक्क दाखवणं, तिचं स्पष्ट बोलणं जे त्याला नेहमीच आवडायचं ते आज पुन्हा त्याला मनापासून आवडून गेलं. " माझंही एक छोटंसं कुटूंब होतं. मी, माझी पत्नी वीणा जी एका कॉर्पोरेट