कामीनी ट्रॅव्हल - भाग १८

  • 2.1k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १८ आशूने हर्षवर्धनला टूरवर नेण्याची परवानगी दिल्यानंतर काय होईल बघू . हर्षवर्धनला टूरवर नेता येऊ शकतं हे कळल्यावर प्राचीला फार आनंद झाला.आता हर्षवर्धन लवकर बरा होईल. एका वेगळ्या आनंदाने तिचं मन भरून आलं. हर्षवर्धन चांगला बरा झाल्यावच प्राची आणि हर्षवर्धन यांचं वैवाहिक जीवन सुरू होईल. यामुळे प्राचीला आनंद झाला. प्राची संयमी वृत्तीची असल्यामुळेच ती आपल्या संसाराची सुरुवात होण्यासाठी वाट बघू शकली. आईंना ही बातमी सांगीतलीच पाहिजे. प्राचीने घरचा फोन नंबर फिरवला.आणि आनंदाने तिने ही गोष्ट कामीनी बाईंना सांगीतली. त्याही खूप खूष झाल्या. *** ट्रॅव्हल्स कंपनीत सुरवातीला एक आचारी त्याचा असीस्टंट, एक टूर लीडर एवढेच होते. पेपरमध्ये टूर