कामीनी ट्रॅव्हल - भाग १७

  • 1.8k
  • 1.1k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १७ या भागात आशू हर्षवर्धनमध्ये कसा बदल घडवेल बघू. आशूशी बोलणं झालं त्याप्रमाणे ती आजपासून येणार हे प्राची कामीनी बाईंना सांगीतलं आणि प्राची ऑफिसमध्ये निघाली. ऑफीसमध्ये गेल्यावर एक दोन मिटींग होत्या त्यातील पहिली मिटींग झाली. दुसरी मिटींग चालू असतानाच कामीनी बाईंचा फोन आला.यावेळी कामीनी बाईचा फोन बघून प्राचीला आश्चर्य वाटलं.तिने मिटींग थोडावेळ थांबवून फोन घेतला. " हॅलो.आई आत्ता कसा काय फोन केला? घरी सगळं ठीक आहे ना?" प्राचीने पलीकडून कामीनी बाईंनी फोन उचलल्या उचलल्या प्रश्न केला. "हर्षवर्धन खूप उदास आहे मी त्याला खूप विचारलं पण तो त्यांना काही सांगायलाच तयार नाही. काय करायचं?" प्राचीला कामीनी बाईंचा आवाजात