कामीनी ट्रॅव्हल - भाग १५

  • 2.2k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १५ मागील भागात आपण बघीतले की प्राची हर्षवर्धनला आपल्या बरोबर टूरवर न्यायचं ठरवते. हर्षवर्धन जाईल का बघू या भागात. " आई यावेळी मी साउथच्या टूरवर हर्षवर्धनला बरोबर घेऊन जावं असा विचार करतेय." प्राची कामीनी बाईंना म्हणाली. नुकतंच रात्रीची जेवणं आटोपली होती आणि कामीनी बाईं बाहेर अंगणात शतपावली करत असताना प्राची अंगणात येऊन त्यांना म्हणाली. " प्राची विचार तुझा चांगला आहे.हर्षवर्धनला कधीतरी टूरवर जायची सवय करावी लागणार पण एकदम एवढ्या लांब न्यायचं का?" " काय हरकत आहे? अर्धा प्रवास ट्रेनने होणार आहे. माझ्याबरोबर शशांक पण येणार आहे.आपला टूरलिडर निखील आहेच. टूरलिडर असला तरी प्रत्यक्ष टूर कसा असतो? तिथे