कामीनी ट्रॅव्हल - भाग १४

  • 2.1k
  • 1.2k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १४ मागील भागावरून पुढे.. प्राची, राधा आणि शशांक ठरल्याप्रमाणे मंगेशभाईंच्या ऑफीसमध्ये पोचले. " या.बरं झालं आज आपण भेटलो." " का काय झालं?" प्राचीने विचारलं. " आत्ताच ब्रोकरचा फोन आला.आपल्याला हवी तशी जागा मिळाली आहे.कधी बघायला येताय म्हणून विचारत होता." मंगेश भाई प्राचीकडे बघून म्हणाले. " जागा उद्याही बघायला जाऊ शकतो. तुम्ही तुमच्या सोयीची वेळ सांगा. तसच डिपाॅझीट भाडं आपल्या आवाक्यात असलं पाहिजे." प्राची म्हणाली. " हो मंगेश भाई ते जरा बघायला हवं." शशांक मंगेश भाई ला म्हणाला. " अरे शशांक तुम चिंता मत करो.प्राची मॅडमना त्यांच्या बजेटमध्ये बसेल आणि त्यांना आवडेल अशीच जागा मी बघतोय.ही जागा बघा