कामीनी ट्रॅव्हल - भाग १२

  • 2.1k
  • 1.3k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १२ हर्षवर्धन प्राचीशी काहीतरी बोलायला आलेला असतो हे आपण मागील भागात बघीतलं. या भागात बघू हर्षवर्धन प्राचीला काय सांगतो. " हर्षवर्धन बोल नं.तू काही तरी सांगायला आला होतास नं?" " प्राची तू सांगशील तसं मी वागीन.मला तू खूप आवडतेस.पण तू रूसून नकोस माझ्यावर." एवढं बोलून हर्षवर्धनचा चेहरा गोरामोरा झाला.तो जरा घाबरून एकदा प्राचीकडे एकदा खाली बघू लागला.हाताची चाळवा चाळव करू लागला. त्यांची ती बावरलेली स्थिती बघून प्राचीला हसू आलं पण लगेच तिने स्वतःला सावरलं.तिच्या लक्षात आलं हर्षवर्धनचं गोंधळलेली अवस्था आत्ताच दूर करायला हवी नाही तर दोघांमध्ये नेहमीसाठी अवघडलेपण राहील जे हर्षवर्धनसाठी योग्य नाही. अशा अवघडलेल्या अवस्थेत हर्षवर्धनची