कामीनी ट्रॅव्हल्स भाग १० मागील भागावरून पुढे.हर्षवर्धनला रिहॅबसेंटरला ठेवल्यानंतर प्राची एक दिवस माहेरी गेली.आईबाबा खूष झाले तिला अचानक बघून.प्राचीनी दोघांना समोर बसवून हर्षवर्धनबद्दल सगळं सांगीतलं.ही गोष्ट ऐकल्यावर अशोक आणि वासंतीला फार धक्का बसला. अशोक म्हणाला " प्राची तू सारखी शंका काढत होतीस तेव्हा आम्ही तुझं ऐकायला हवं होतं.आता काय करायचं?" " परवा हर्षवर्धनला रिहॅब सेंटर मध्ये ठेवलंय.तो बरा झाला की आम्ही तिचं वेगळं राहू." " तिघं?" "हो.मी ,हर्षवर्धन आणि आई.भय्यासाहेब फार नीच माणूस आहे.आई मात्र देवमाणूस आहेत.परीस्थितीमुळे त्या घरात आई अडकून पडल्या. भय्यासाहेब नीच म्हणजे इतके नीच आहेत की त्यांचं लक्ष माझ्यावर आहे." " काय?" अशोक वासंती दोघंही जोरात ओरडले.