कामीनी ट्रॅव्हल - भाग ७

  • 2.5k
  • 1.6k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ७वा मागील भागावरून पुढे. संध्याकाळी नववधू प्राचीचं स्वागत पटवर्धनांच्या घरी खूप झोकात झालं. संपुर्ण बंगल्याला दिव्यांची रोषणाई केली होती.मुख्य दारापासून आतल्या दारापर्यंत फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. दोघांवरही फुलांचा वर्षाव केल्या जात होता. नवीन नवरीच्या गृहप्रवेश झाला. नंतर उखाणे घेण्याचा कार्यक्रम झाला. इतकावेळ हर्षवर्धन आपल्याबरोबर असूनही तो आपल्यापासून खूप लांब आहे असंच प्राचीला वाटत होतं. त्याच्याकडे ती डोळ्यांच्या कोप-यातून बघत होती. त्यांच्या चेह-यावर आनंद दिसत नव्हता. तो ढिम्मच बसलेला होता. तिचं लक्ष सासूकडे गेलं आत्ताही त्यांचा चेहरा तसाच गंभीर होता जसा मांडवात होता. तिला एका खुर्चीवर बसायला जागा दिली कोणीतरी. ती बसली नंतर थोड्याच वेळात तिच्या लक्षात आलं