कामीनी ट्रॅव्हल्स भाग ६वा मागील भागावरून पुढे. साखरपुडा व्यवस्थित पार पडला होता. लग्नाची खरेदी सुरू झाली होती. साखरपुडा झाल्यावरही हर्षवर्धनचा एकपण फोन नाही आला याचं प्राचीला आश्चर्य वाटत होतं.त्यादिवशी तिनी केला होता तर हर्षवर्धनला त्यांनी फोन दिला नाही.नंतरही त्याचा फोन आला नाही. तिनी ते आई- बाबांना बोलूनही दाखवलं. अशोक आणि वासंतीनं प्राचीन बोलणं फारसं मनावर घेतलं नाही. विचार करून प्राची थकून गेली. एक दिवस तिनी अशोक आणि वासंतीवर बाॅंम्ब हल्लाच केला. "आई बाबा तुम्हाला मी खूपदा त्या मुला बद्दल सांगीतलं पण तुम्ही लक्ष देत नाही मला असं वाटतंय त्यांच्या श्रीमंतीची तुम्हाला भूरळ पडली आहे. त्यादिवशी त्यांच्या घरी आपण गेलो होतो