कामीनी ट्रॅव्हल - भाग ४

  • 2.4k
  • 1
  • 1.4k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग ४था मागील भागात आपण बघीतले की प्राचीने हर्षवर्धनच्या स्थळाला होकार द्यावा असं अशोक आणि वासंती यांना मनापासून वाटत असतं.बघूया प्राची होकार देईल का? मागील पानावरून पुढे. त्या दिवशी प्राचीनी आईबाबांच्या नकळत त्यांचं बोलणं ऐकलं होतं.वासंती कळकळीनी अशोकला म्हणत होती."अहो आपण या स्थळाला हो का म्हणतोय हे तिला समजणार नाही का?" "तू काळजी करू नकोस.आपली प्राची समजूतदार आहे.तिला कळेल आपण सांगीतलं तर.मी ऊद्या बोलतो तिच्याशी" अशोक म्हणाला."आयुष्यभर आपली आर्थिक कोंडी मिटवताना फरपट झाली. प्राची इतकी शहाणी की प्रत्येक वेळी पैशाकडे बघून मला ती गोष्ट नको म्हणत गेली. सासरी तरी तिला हव्या त्या गोष्टी सहज मिळतील. हर्षवर्धनचं काय तो