कामीनी ट्रॅव्हल - भाग १

  • 8.2k
  • 4.6k

कामीनी ट्रॅव्हल्स भाग १ला.","कामीनी ट्रॅव्हल्स...भाग १ ला हाॅल गच्च भरला होता. यावर्षी लागोपाठ तिस-यांदा कामीनी ट्रॅव्हल्सला उत्तम कामगिरीबद्दल पुरस्कार मिळाला होता. कामीनी ट्रॅव्हल्सचा सर्वेसर्वा होता हर्षवर्धन पटवर्धन. फार कमी दिवसांत हर्षवर्धननी आणि कामीनी ट्रॅव्हल्सनी आपले पाय ट्रॅव्हल्स च्या क्षेत्रात मजबूतपणे रोवले होते. सतत तीन वर्ष हा पुरस्कार पटकावून हर्षवर्धनने हॅट्रीक साधली होती. म्हणून या वर्षी कामीनी ट्रॅव्हल्सच्या दृष्टीनी कार्यक्रमाला चार चांद लागले होते. कामीनी ट्रॅव्हल्सच्या सगळ्या लोकांसाठी हा दिवस खूप आनंदाचा होता. ट्रॅव्हल्सच्या या क्षेत्रात खूपच स्पर्धा होती. प्रत्येकजण प्रवाश्यांना आकर्षित करण्यासाठी काही न काही आकर्षक गोष्टी प्रवासात ठेवतात. कामीनी ट्रॅव्हल्स सुरु झाली ती एका टूरनी आणि सहा कर्मचा-यांच्या साथीने.