प्राक्तन - भाग 4

  • 3.2k
  • 1.7k

प्राक्तन -४आतापर्यंत आपण बघितलं की पतीच्या विवाहबाह्य संबंधांमुळे आत्महत्या करायला निघालेल्या अनिशाला यशने वाचवलं आणि आनंदी जीवन जगण्याचं सुत्रही लक्षात आणून दिलं. त्यामुळे अनिशा सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून स्वता साठी जगत स्वताला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर तिला कळून चुकलं की सर्व फक्त यशमुळेच शक्य झालं आणि तिने त्याला पून्हा त्याच टेकडीवर भेटून त्याचे आभारही मानले. आता आठवड्यातून एकदा तरी ती तिथे जायचीच. दोघांमधला सलोखा वाढत होता. त्यानंतर अनिशाला मात्र यशबद्दल विशेष जिव्हाळा आणि आपुलकी वाटत होती. एवढं असलं तरी त्या दोघांनी नावाव्यतिरिक्त वैयक्तिक आयुष्य अजूनही एकमेकांसोबत शेअर केलं नव्हतं. आणि ते जाणून घेण्याच्या आशेने अनिशा पून्हा यशकडे गेलेली.