प्राक्तन - भाग 3

  • 3.7k
  • 2k

प्राक्तन -३अनिशा सहा वाजता सकाळी घरी आली ती मोकळ्या आणि हलक्या मनाने... सकाळचं कोवळं ऊन स्पर्श करून जात होतं. फ्रेश वाटत होतं तिला आता. मन स्थिर असलं की कसलेच विचार आजूबाजूला फिरकत नाहीत याचा पुरेपूर अनुभव तिला येत होता. मनावरचं खूप मोठं ओझं उतरल्यासारखं वाटत होतं. तिच्या वागण्यातील या बदलामुळे मात्र मयुरेश विचारात पडायचा. पण तिला आता या गोष्टी खूप क्षुल्लक वाटायला लागलेल्या... ती त्याला वेळेनुसार मोजकंच बोलून इग्नोर करत होती. जे तो मागची अडीच वर्षे तिच्यासोबत करत आलेला... मयुरेश आता रात्री रोजच्यापेक्षा लवकर घरी येऊ लागलेला... तिचं आणि अमेयचं अटेन्शन मिळावं म्हणून धडपडत होता. पण तिला या गोष्टीचा काहीच