प्राक्तन - भाग 2

  • 4.2k
  • 2.2k

प्राक्तन-२दोन तीन दिवस उलटून गेलेले... ती शांतच होती, मनानेही शांत. यशचं म्हणणं सिरियसली घेतलेलं तिने. आता मनात काहीच ठेवावंसं वाटत नव्हतं. कारण मन रितं करायचं ठरवलेलं तिने. ना कसली काळजी, ना नवर्याच्या प्रकरणांची इनसिक्यूरिटी,ना जास्त विचार, ना कसली चिडचिड... तिच्या वागण्यातला अचानक झालेला बदल मयुरेशच्या म्हणजेच तिच्या नवर्याच्या लक्षात आलेला.. पण त्याला आता तिला विचारण्याचं किंवा सामोरं जाण्याचं धाडस राहिलं नव्हतं. तो फक्त पाहत होता त्याशिवाय पर्याय उरलेला नव्हता. आज रविवार ऑफिसला सुट्टी असल्याने दोघेही घरातच होते. पण ती मात्र लवकरच उठलेली, आज ती ट्रेकिंगला जाणार होती एकटीच... तिची आवराआवर चालु होती. ते बघून त्याने न राहवून विचारलं," आज रविवारी