मला स्पेस हवी पर्व २ भाग ३०

  • 1.5k
  • 804

मला स्पेस हवी पर्व २ भाग ३०मागील भागात आपण बघीतलं की नेहा पुण्याला येईन असं सासूला म्हणाली खरच जाईल का? बघूया या भागात.रात्री सुधीरच्या आईच्या मोबाईल वर नेहाचा मेसेज आला. मी ऊद्या रात्रीच्या बसने निघतेय. सुधीर ,ऋषी आणि माझ्या माहेरी सांगू नका. हे आपलं गुपीत आहे. मेसेज बरोबर नेहाने स्माईली टाकला.मेसेज वाचून सुधीरच्या आईला खूप आनंद झाला.तिने लगेच तो मेसेज सुधीरच्या बाबांना दाखवला. त्यांनाही मेसेज वाचून आनंद झाला.“ अहो किती महिन्यांनी नेहाला बघणार आहोत.”“ हो ना. मला वाटतं आता ती बरीच मोकळी झाली असेल म्हणून तिला इकडे मावस वाटलं.”“ खरय. प्रियंकाच्या जाण्यानंतर आपल्या नातेवाइकांनी फारच घोळ घातला. नेहा दु:खात असून