मला स्पेस हवी पर्व २ भाग २२

  • 1.8k
  • 1.1k

मला स्पेस हवी पर्व २ भाग २२मागील भागात आपण रमण आणि छकूचं संभाषण वाचलं. आता बघू.नेहा ऑफिसमध्ये येते. येतानाच अपर्णा भेटते.दोघी बोलत बोलत नेहाच्या केबीनपाशी येऊन बोलत उभ्या राहतात.“ गुड मॉर्निंग मॅडम.”“गुड मॉर्निंग.”“कसे गेले दोन दिवस?”अपर्णाने विचारलं.“छान गेले. ऋषी खूपच खूष होता.”“असणारच. तुम्ही पण खूप खूष दिसताय. तुमच्या चेहऱ्यावरचा ग्लो सांगतोय.”यावर नेहा हसली आणि जरा लाजली. तिच्या मनात सुधीरबरोबर घालवलेले मोहक क्षण रूंजी घालत होते.“त्यादिवशी मॅडम तुम्ही जरा कमी बोलत होता त्यामुळे माझ्या मिस्टरांना वाटलं की तुम्हाला आवडलं नाही आमच्या कडे?”“अगं नाही असं काही नाही. सुधीर तर खूप छान मिक्स झाला होता. तुझ्या मिस्टरांशी किती बोलत होता.”“या दोघांचं ट्युनिंग खूप