मला स्पेस हवी पर्व २ भाग २१

  • 630
  • 384

मला स्पेस हवी पर्व २ भाग २१मागील भागात आपण बघीतलं की सुधीर निशांतला आणि अक्षयला रमण बद्दल सांगतो.या भागात बघू काय होईल.छकूच्या बोलण्यावर रमण विचार करू लागला.आज त्याची नेहाच्या नव-याशी ओळख झाली. रमण जेव्हा नेहाच्या घरी गेला तेव्हा त्याला कल्पना नव्हती की नेहाकडे तिचा नवरा आला असेल.दरवाज्याची बेल वाजवण्यापूर्वी रमणच्या मनात आनंद संगीत वाजायला लागलं होतं. त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं की तो नेहाला भेटण्यासाठी किती उत्साहीत झालेला आहे. क्षणभर त्याच्या मनात नेहाबद्दल ऊचंबळून आलेलं प्रेम नेहाच्या घराचा दरवाजा उघडल्यावर दारात नेहा ऐवजी कोण्या पुरूषाला बघून एकदम भुईसपाट झालं.नेहाच्या आयुष्यात आपल्या शिवाय दुसरा पुरूष माणूस रमणने अपेक्षितच केला नव्हता जरी