मला स्पेस हवी पर्व २ भाग २०

  • 2k
  • 1.3k

मला स्पेस हवी पर्व २ भाग २०मागील भागात आपण बघीतलं की छकू रमणला समजावते आता या भागात बघू काय होईल?सुधीर नेहाला भेटून बंगलोरहून पुण्याला परत आला. पुण्याला आला तरी अजूनही त्याच्या मनावर नेहाच्या प्रेमाची ,स्पर्शाचे मोहिनी होती. सुधीर खूप खुश होता त्याला बघितल्यावरच त्याच्या आई-वडिलांना त्याच्या मनातला आनंद कळला. सुधीर आणि ऋषी घरात शिरताच सुधीरची आई म्हणाली,“ अरे वा सुधीर तुझा आणि ऋषीचा चेहरा सगळ सांगून जातोय. तुम्ही खूप आनंदात आहात. बंगलोर ट्रिप यशस्वी झाली ना ?”यावर सुधीर हसतच म्हणाला ,“होय खूप छान झाली ट्रिप. नेहा पूर्वीसारखीच भेटली मला. आणि…”सुधीर बोलता बोलता मधेच ‌ थांबला.“काय रे सुधीर बोल नं मध्येच