मला स्पेस हवी पर्व २ भाग १७

  • 2.1k
  • 1.2k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १७मागील भागात आपण बघितले ते नेहा कडे कोणीतरी आलंय.आता बघू पुढे काय होईल.दारातील व्यक्तीला बघून नेहाचा चेहरा पडला, तिची पावलं लगेच थबकली. तिची ही अवस्था बघून सुधीरला काही कळलं नाही.“नेहा कोणीतरी आलंय तुझ्या कडे.”“अं हो “म्हणत नेहा पुढे झाली. दारात अचानक रमणला बघून नेहा दचकली.“या न रमण सर”नेहा म्हणाली.“हो “म्हणत बावरलेला रमण आत आला.“बसा” नेहा म्हणाली.रमण सोफ्यावर बसला. सुधीरला बघून रमण गोंधळून गेला. त्याला नेहा घरी एकटीच असेल असं वाटलं होतं. हा माणूस कोण आहे? नेहाचा नवरा असावा. रमणच्या डोक्यात विचारचक्र फिरत होतं.‘रमण सर हे माझे मिस्टर सुधीर.”नेहाने सुधीरची ओळख करून दिली.नेहाच्या बोलण्याने रमण