मला स्पेस हवी पर्व २ भाग १४

  • 2.4k
  • 1.5k

मला स्पेस हवी पर्व २ भाग १४मागील भागात आपण बघितलं की नेहा सुधीरजवळ बरच बोलते आणि शांत होते. या भागात बघूया काय होईल?सकाळी उठल्यावर नेहा खूप फ्रेश दिसते. तिला बघून सुधीरला आनंद होतो.“ गुड मॉर्निंग.”“ गुड मॉर्निंग “नेहा प्रत्युत्तर देते.“ आज काल पेक्षा तू खूप छान फ्रेश दिसते आहेस.”सुधीर म्हणाला.“ हो. काल तू जवळ होतास त्यामुळे कुठलंच टेन्शन माझ्या मनावर नव्हतं.”तिचा हातात हात घेऊन सुधीर म्हणाला,‘नेहा एवढंस आयुष्य आहे आपल्याला. किती ते सांगता येत नाही. मग त्या छोट्याशा आयुष्यात आपण चिंताग्रस्त होऊन का जगायचं ?म्हणून तुला म्हणतो तू टेन्शन घेऊ नको. तुला छान स्पेस मिळाली. तू आनंदी झालीस. तू स्वतःला