मला स्पेस हवी पर्व २ भाग ११

  • 2.5k
  • 1.6k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ११मागील भागात आपण बघीतलं की नेहाच्या ऑफिसमध्ये अचानक रमणची बायको आली. त्यामुळे नेहा गडबडली. आता पुढे काय होईल ते बघू.छकु नेहाच्या ऑफिसमधून बाहेर पडली. इकडे नेहाच्या केबिनमध्ये नेहा आणि अपर्णा विचित्र भाव अवस्थेत होत्या.अपर्णांनी विचारलं,“ नेहा मॅडम हे काय होतं?”नेहा म्हणाली,“ तेच मला कळत नाही. मला कधीच वाटलं नव्हतं की रमण शहाची बायको आपल्याला भेटायला येईल .एक प्रकारे ते बर झालं. मला सारखं मनातून वाटायचं की रमणच्या बायकोला त्याचं वागणं कळल्यावर तिची काय अवस्था होईल. त्यामुळे मला प्रचंड टेन्शन यायचं. बरं झालं ती आली आणि मी तिला खरं काय आहे ते कळलं.”यावर अपर्णा म्हणाली,“