मला स्पेस हवी पर्व २ भाग ७

  • 2.6k
  • 1.7k

मला स्पेस हवी पर्व २ भाग ७मागील भागात आपण बघीतलं की रमणच्या बायकोला त्याच्या बद्दल संशय येतो पण खात्री नसते. या भागात बघू काय होईलरमणची बायको प्रचंड तणावाखाली असते. भीतीचा एक प्रचंड मोठा गोळा तिच्या मनात गरगर फिरत असतो. तिला दोन वर्षांपूर्वीचा प्रसंग आठवला. ती अशीच संध्याकाळी आपलं काम आटोपून आईवडिलांना भेटायला गेली होती. दारावरची तिने बेल वाजवली. दार उघडल्यावर दारात तिला बघताच तिची आई आनंदाने म्हणाली,“ छकू किती दिवसांनी आलीस ग? कशात बिझी होतीस?”आईने विचारलं. “ अगं सध्या मी मुलांच्या जगात गुरफटून गेली आहे.”“ त्यात रमण सुद्धा असेल त्रास द्यायला “आईने हसत म्हटलं. छकूच्या चेहऱ्यावर उदास भाव आले. तिच्या