ब्लॅकमेल - प्रकरण 7

  • 2.7k
  • 1.8k

प्रकरण ७ “ एवढे सांगण्यासाठी तुम्ही रीवावरून एवढे लांब इथे आलात?” “ काय चूक आहे त्यात?” “ कारण पैसे कुठे गेले ते आम्हाला माहित नाहीये अजून.आम्हाला एवढंच माहित झालाय की रोख रकमेत तूट आली आहे.” “ खात्री आहे तुमची?” पाणिनीने विचारलं. “ अर्थात.वीस लाख तूट आहे.” धारवाडकर म्हणाला. “ एवढी मोठी रक्कम रोख स्वरूपात तुम्ही कंपनीत ठेवता?” पाणिनीने विचारलं. “ त्यापेक्षा खूप मोठ्या रकमा ठेवतो आम्ही. बरेचसे व्यवहार रोखीत करून आम्ही डिस्काउंट मिळवतो. विशेषतः बँका बंद असतात त्या आणि त्याच्या आदल्या दिवशी आम्ही मोठी रक्कम ठेवतो.” “ आणि त्याच्या हिशोब पुस्तकातील नोंदी बद्दल तुम्ही फारसे जागरूक नसता? सोयीस्कर पणे?” पाणिनीने