ब्लॅकमेल - प्रकरण 6

  • 3.3k
  • 2k

प्रकरण ६ एकादषम अर्वाचिन कंपनीचे ऑफिसपाशी पाणिनी आला तेव्हा १०.२० झाले होते. तो अशा जागी उभा होता की आत येणारे कंपनीचे लोक त्याला बरोब्बर दिसत होते.ठीक १०.३० ला प्रचिती पारसनीस दारातून आत येतांना दिसली. “तू कुठे होतीस काल?” पुढे होत पाणिनी ने विचारलं. तिने पाणिनीचा हात असा काही पकडला की त्या स्पर्शावरून पाणिनीला जाणवलं की तिला त्याच्या शारीरिक आणि मानसिक आधाराची गरज होती. “ आज पहाटे ३.२५ ला प्रयंक गेला ! ” ती मुसमुसत म्हणाली. “ ओह ! प्रचिती, माफ कर मला.तुमचं खूप प्रेम होतं एकमेकांवर. पण प्रचिती, आपल्याला थोडं भावनिक न होता काही महत्वाची काम पार पडायची आहेत.” “