शब्दशः(अक्षरशः) अर्थ:- सगळीकडे मातीच्याच चुली असतात कोणाकडे लाकडाची कोणाकडे लोखंडाची असे नसते. किंवा कुठेही गेलं तरी पळसाला तीनच पानं असतात. लाक्षणिक अर्थ(गर्भितार्थ):- इथून तिथून सगळीकडची परिस्थिती सारखीच असते आणि मानवी स्वभाव थोडया फार फरकाने सारखाच असतो. त्यावर आधारित कथा:- या उन्हाळाच्या सुट्टीत रमा आत्याच्या मुलाचं लग्न होतं त्यामुळे सगळे पाहुणे गावी तिच्या घरी जमले होते. रमा आत्या मोठी आणि शामा आत्या धाकटी अश्या मला दोन आत्या आहेत. आणि रमेश काका माझे धाकटे काका आहेत. रमेश काकांना एकच मुलगी आहे नीता तिचं नाव ती साधारण माझ्याच वयाची आहे. रमा आत्याकडेचे हे शेवटचेच कार्य कारण राकेश चे लग्न झाले होते त्याला तर