सलाईन थेरपी

  • 2.5k
  • 1
  • 798

सलाईन थेरपी के. के. अॅग्रो प्रॉडक्टस च्या डायरेक्टर बोर्डाची दुपारी अडीज वाजता सुरो झालेली मिटिंग रात्री साडे दहाला संपली.चौदावर्षाच्या कारकीर्दीत इतकी लांबलेली ही पहिलीच मिटींग! प्रदीप मिटींगमधून बाहेर पडला तरी टेन्समध्येच होता. गॅट करार झाल्यानंतर असंख्य बहुराष्ट्रीय कंपन्या अक्षरश: टोळधाडी सारख्या भारतातल्या अॅग्रिकल्चर सेक्टरमध्ये घुसल्या. विक्रेत्यांना भरपुर कमिशन, जबरदस्त अॅडव्हर टायझिंग, आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्सना तोबरे चारून खिरापतीसारखे मिळवलेले आय.एस.आय. मार्क! ह्याच्या जोडीला प्रचंड आर्थिक पाठबळ आणि मार्केट कॅप्चर करण्यासाठी वाट्टेल त्या हीन पातळीवर जायची नीतीमत्त!!!! के.के.सारख्या रिनाऊण्ड रिलाएबल ग्रूपलासुद्धा त्यांचा फटका बसला.त्यांच्या अॅग्रो प्रॉडक्टस् ची विक्री खप खूप घसरायला लागली. हे असं फार काळ सुरु राहणं कंपनीला परवडणारं नव्हतं, कंपनी