लग्नाची गोष्ट भाग ५ एकोणीसशे पंचाऐंशी फेब्रुवारीत माझे लग्न ठरले.माझी जरी सरकारी नोकरी होती तरी घरच्या जबाबदाऱ्या अंगावर असल्याने लग्न करुन संसार थाटण्याइतपत अजून मी आर्थिकदृष्ट्या सक्षम झालेला नव्हतो.खरं तर अजूनही माझे बँकेत अकाऊंटही नव्हते. आमच्या ऑफिसच्या पी अँड टी सोसायटीचे कर्ज अधिक माझ्या नियोजित पत्नीच्या ऑफिसच्या पतपेढीचे लग्नाआधीच कर्ज घेऊन कशीबशी मी लग्नाच्या खर्चाची तजवीज केली होती. १६ मे ही लग्नाची तारीख ठरली,पण काही कारणाने माझ्या घरातून एक वेळ आर्थिक मदत सोडा,पण लग्नाच्या तयारीसाठीही म्हणावे तसे सहकार्य नव्हते. निमंत्रणपत्रिका वाटणे,गावाकडून वऱ्हाड आणण्यासाठी ट्रक ठरवणे,रितीप्रमाणे भावकीची बैठक, लग्नसमारंभाचे बारीकसारीक नियोजन अशा गोष्टी माझ्या लग्नाच्या आदल्या रात्री उशीरपर्यंत बाळू नितननवरे या