लग्नाची गोष्ट भाग ४ माझ लग्न ठरलं लग्नपत्रिकाही छापून आल्या. निमंत्रण करायला सुरूवात करायची होती.त्यावेळी मी पुण्यात नागपूर चाळीत भावाच्याकडे रहायचो. मी असा विचार केला की ज्या वस्तीत आपण इतके दिवस रहातोय, जिथे राहून आपण शिकता शिकता नोकरी मिळवली,आपल्या वाईट काळात ज्या वस्तीने आधार दिला तेथील प्रतिष्ठीत व्यक्तींना आपण प्रथम निमंत्रण पत्रिका देवू या! या वस्तीत आमच्या छत्रपती शिवाजी मंडळाने साईबाबा मंदिर बांधले होते. या साईं मंदिराचा मी सुरूवातीपासून क्रियाशील सदस्य होतो. सर्वप्रथम मी बाबांच्या मुर्तीसमोर लग्नपत्रिका ठेवली. साईबाबाना मनोभावे नमस्कार करून पत्रिका देण्यासाठी पहीली व्यक्ती निवडली- श्रीयुत गाडेवकील! या वकील साहेबांचे आणि माझी जरी फक्त तोंडओळख होती तरी कधी